पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गुरु परमात्मा परेशु

इमेज
गुरू म्हणजे ज्ञान, गुरू म्हणजे निरंतर वाहणारी नदी, गुरू म्हणजे सतचितआनंद, गुरू म्हणजे कुबेराचे धन, गुरू म्हणजे प्रसाद.  हा दैवी प्रसाद ज्याला मिळाला त्याचे जीवन  धन्य झाले. यंदा कोरोनामुळे जी परिस्थिती उदभवली आहे, त्यामुळे सगळेच सण, उत्सव , डिजिटली साजरे होत आहेत. ज्या वारी कडे असंख्य लोकांची नजर असते ती सुध्दा मनवारी ठरली.अति तेथे माती हे उगीच नाही म्हटल्या जात.आपल्याला सतत सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होत गेल्या तर त्याच महत्व उरत नाही.  म्हणूनच भगवंतांनी हे संकट निर्माण करून प्रत्येकाला ज्याचे त्याचे स्थान दाखवून दिले. गुरूला अध्यात्म शास्त्रात अनन्य साधारण महत्व आहे, आपल्या संस्कृतीत अनेक गुरू शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत,जसे रामकृष्ण- विवेकानंद, मच्छिन्नद्रनाथ-गोरक्षनाथ, कृष्ण-अर्जुन, ह्या सगळ्यांनी प्रसंगी आपल्या शिष्याची कान उघडणी केली आणि त्याला योग्य मार्ग दाखविला. खरच प्रत्येकाला असा गुरू मिळावा जो आपल्याला कठीण प्रसंगात मार्गदर्शन करेल. माझे पहिले गुरू माझे आई-वडील. त्यांच्यामुळेच  मलाही लहान वयातच सद्गुरूंचा  सहवास लाभला .  स्वामी  *श्री. व...