पोस्ट्स

गुरु परमात्मा परेशु

इमेज
गुरू म्हणजे ज्ञान, गुरू म्हणजे निरंतर वाहणारी नदी, गुरू म्हणजे सतचितआनंद, गुरू म्हणजे कुबेराचे धन, गुरू म्हणजे प्रसाद.  हा दैवी प्रसाद ज्याला मिळाला त्याचे जीवन  धन्य झाले. यंदा कोरोनामुळे जी परिस्थिती उदभवली आहे, त्यामुळे सगळेच सण, उत्सव , डिजिटली साजरे होत आहेत. ज्या वारी कडे असंख्य लोकांची नजर असते ती सुध्दा मनवारी ठरली.अति तेथे माती हे उगीच नाही म्हटल्या जात.आपल्याला सतत सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होत गेल्या तर त्याच महत्व उरत नाही.  म्हणूनच भगवंतांनी हे संकट निर्माण करून प्रत्येकाला ज्याचे त्याचे स्थान दाखवून दिले. गुरूला अध्यात्म शास्त्रात अनन्य साधारण महत्व आहे, आपल्या संस्कृतीत अनेक गुरू शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत,जसे रामकृष्ण- विवेकानंद, मच्छिन्नद्रनाथ-गोरक्षनाथ, कृष्ण-अर्जुन, ह्या सगळ्यांनी प्रसंगी आपल्या शिष्याची कान उघडणी केली आणि त्याला योग्य मार्ग दाखविला. खरच प्रत्येकाला असा गुरू मिळावा जो आपल्याला कठीण प्रसंगात मार्गदर्शन करेल. माझे पहिले गुरू माझे आई-वडील. त्यांच्यामुळेच  मलाही लहान वयातच सद्गुरूंचा  सहवास लाभला .  स्वामी  *श्री. व...

मुलखावेगळी माणस

इमेज
राणी माझी खूप जवळची मैत्रीण.खरतर ती तशी खूप उशीरा माझ्या आयुष्यात आली.आशुतोष आणि श्रद्धानंद हे जिवलग मित्र.लग्नेही मागेपुढेच झाली.आमच्या साक्षगंधात नवऱ्याच्या मित्राची बायको म्हणून राणी पहिल्यादा भेटली आणि ती माझीही जिवलग कधी झाली ते कळलच नाही.अगदी सख्या बहिणीसारखे आमचे सूर जुळले.आमचा नवा संसार,मुलांचं लहानपण या सगळ्यांवर तिच्या घट्ट आणि स्निग्ध स्नेहाची साथ कायम सोबत होती आणि आहे.लहान मोठा कुठलाही प्रॉब्लेम तिच्याशी  शेअर केला नाही असं कधी घडलं नाही.मुलांना तर तिचा खूपच लळा. राणी म्हणजे उत्साहाचा खळाळता झरा.मी तिला आजवर कधीही डिप्रेस,उदास बघितलेलं नाही.ती एक उत्तम डॉक्टर आहे सोबतच आदर्श गृहिणीही.तर श्रद्धानंद अगदी लहान वयात खूप मोठे नाव,प्रतिष्ठा कमावलेले प्रसिद्ध वकील.सुखी आणि समृद्ध संसार. आयुष्याच्या या स्थिर टप्यावर आपण सारेच खूप आत्मकेंद्रीत होत जातो.वैयक्तिक जीवनातलं राहून गेलेलं सगळं मिळवण्यासाठी हपापल्यासारखे धावतो.आपली मुलं आणि त्यांचं करिअर हेच आपल्या जगण्याचं केंद्र,आपलं सर्वस्व असत. नेमक्या या टप्यावर राणी मात्र इतरांच्या मुलांसाठी जगते आहे.तेही अबोलपणे,कुठलाही गाजा वा...